शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखाचे कर्ज फेडण्यासाठी केले ५ वर्षाच्या मुलाचे अपहरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 19:04 IST

प्रेयसीच्या मैत्रिणीच्या घरी अपहृत मुलाला ठेवले लपून 

मुंबई - कर्ज फेडायला पैसे हवे म्हणून अवघ्या एक लाखासाठी पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या आरोपीला साकीनाका पोलिसांनीअटक केली आहे. ८ तासात आरोपीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुलाची सुटका केली.

साकीनाकाच्या काजूपाडा परिसरातील जरीमरी येथे एका चाळीत असलेल्या गारमेंटमध्ये शाकिर सुलेमान शेख (वय - 38) हा कामाला आहे. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचा ५ वर्षांचा मुलगा घराबाहेरून अचानक गायब झाला. त्यांनी परिसर पिंजून काढला. मात्र, त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास शेखला एक निनावी फोन आला आणि तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे. तो जिवंत पाहिजे असल्यास १ लाख रुपये दे अशी मागणी फोनवरून अज्ञात व्यक्ती करू लागला. मुलाचे अपहरण झाल्याचे स्पष्ट होताच शाकिरने साकीनाका पोलीस ठाणे गाठले. याची तात्काळ गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील माने व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. शाकिरच्या घरापासून दोन किलो मीटरच्या अंतरावर राहणारा अक्रम खान (वय - 19) यानेच मुलाचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अक्रमला पोलिसांनी अटक केली. हातगाडीवर मोसंबी ज्युसचा धंदा करणार्‍या अक्रमने मुलाचे अपहरण करून त्याला प्रेयसीच्या मैत्रीच्या घरी लपवून ठेवले होते. अक्रमच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलाची देखील सुटका केली. चौकशीत अक्रमने गुह्याची कबुली दिली. एका खासगी व्यक्तीकडून एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्याचे पैसे परत फेडायचे होते. त्यासाठी एक लाख हवे म्हणून मुलाचे अपहरण करण्याचा शक्कल डोक्यात आली. त्यामुळे शाकिर शेखच्या मुलालाच टार्गेट करायचे ठरवून त्याचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईKidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक