शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाच्या वडिलांचे अपहरण करुन २ कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 12:57 IST

दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले़.

पुणे : मार्केटयार्डमधील बांधकाम व्यावसायिकांच्या वडिलांचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले़. रात्रभर सुरु असलेल्या या मोहिमेत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे़. याबाबतची माहिती अशी, एका बांधकाम व्यावसायिकांच्या ६५ वर्षांच्या वडिलांचा मार्केटयार्डमध्ये व्यापारी गाळा आहे़. मार्केटयार्डमधील दुकान बंद करुन ते रात्री घरी जात होते़. यावेळी गुन्हेगारांनी मार्केटयार्ड येथील वखार महामंडळासमोरुन अपहरण केले़. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मोबाईलवर फोन करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली़. ती दिली नाही तर वडिलांना जीव मारण्याची धमकी दिली़. त्यांनी अपहरणाची ही माहिती तातडीने गुन्हे शाखेला दिली़ याची माहिती मिळताच गुन्हे शाखेची ५ ही पथके तातडीने कामाला लागली़. गुन्हेगारी मध्यरात्री एका ठिकाणी पैसे आणून देण्यास सांगितले होते़. त्यानुसार एका बॅगेत पैसे ठेवून ती बॅग तेथे ठेवण्यात आली़. यावेळी पोलीस सभोवताली पाळतीवर होते़. मात्र, गुन्हेगारांनी पैशाची बॅग घेऊन धुम ठोकली़ त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पैसे घेण्यासाठी आलेल्यांना पकडले़. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून त्यांच्या आणखी काही साथीदारांची नावे निष्पन्न झाली़. त्यांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे़. आतापर्यंत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

...............

गुन्हेगारांनी खंडणीचे दीड कोटी रुपये मिळाल्यानंतर या व्यापाऱ्यांना पुणे सातारा रोडवरील केळवडे येथे गाडीतून सोडून देऊन ते पसार झाले़. त्यानंतर त्यांनी तेथून जाणाऱ्या माणसांकडे विचारपूस केली़. त्या माणसाच्या मोबाईलवरुन आपल्या मुलाला फोन करुन माहिती दिल्यानंतर त्यांना तेथून तातडीने घरी आणण्यात आले़.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डKidnappingअपहरणPoliceपोलिस