घरात घुसून ५-६ दरोडेखोरांनी दागिन्यांसह दीड लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2023 14:59 IST2023-07-24T14:59:06+5:302023-07-24T14:59:21+5:30

कपाटातील सोने व नगदी पैसे असा एकूण एक लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केल्याचे म्हटले.

5-6 robbers broke into the house and stole one and a half lakhs along with jewellery | घरात घुसून ५-६ दरोडेखोरांनी दागिन्यांसह दीड लाखांची चोरी

घरात घुसून ५-६ दरोडेखोरांनी दागिन्यांसह दीड लाखांची चोरी

नांदुरा (बुलढाणा) : नांदुरा तालुक्यातील वडाळी येथे २४ जुलै रोजी रात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात घुसून सोने व चांदी रोख रकमेसह एक लाख पन्नास हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली.                         

याबाबत अनिल उर्फ गजानन शालिग्राम वक्टे (४२) यांनी नांदुरा ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये ५ ते ६ अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील घरात झोपलेले होते. पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले. कपाटातील सोने व नगदी पैसे असा एकूण एक लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केल्याचे म्हटले. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: 5-6 robbers broke into the house and stole one and a half lakhs along with jewellery