शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

४७७ हरवलेल्या, घरातून पळालेल्या मुलांची केली सुटका; पालकांशी पुन्हा भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 20:19 IST

477 missing, runaway children rescued : मध्य रेल्वेच्या आरपीएफ स्टाफची उल्लेखनीय कामगिरी

ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील ३१० मुले आणि १६७ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र आणण्यात आले.  

डोंबिवली: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या ७ महिन्यांत मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ४७७ मुलांना शोधले, काहींना विविध ठिकाणामधून सोडवले आणि त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली. यामध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील ३१० मुले आणि १६७ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र आणण्यात आले.  

त्यापैकी बरेच जण काही भांडणे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात, त्यांच्या कुटुंबीयांना न कळवता रेल्वे स्टेशनवर आले होते.  प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ते प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधीकधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले.  अनेक पालक रेल्वेच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.  या कामगिरीबाबत महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वे पळून गेलेल्या मुलांशी संपर्क साधून, त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांच्या कुटुंबासोबत जाण्यासाठी समुपदेशन करून सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावते.  त्यांनी आरपीएफ आणि फ्रंटलाईन स्टाफचे कौतुक केले जे अशा प्रकरणांतील गांभीर्य ओळखून आणि समुपदेशक म्हणून त्वरित कारवाई करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. 

जानेवारी ते जुलै २०२१ पर्यंत बचावलेल्या मुलांचे विभागवार विभाजन बाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबई विभाग १६६ मुले (१०४ मुले आणि ६२ मुली). भुसावळ विभाग ७० मुले (३९ मुले आणि ३१ मुली). नागपूर विभाग ४० मुले (२२ मुले आणि १८ मुली). पुणे विभाग १७१ मुले (१३० मुले आणि ४१ मुली). सोलापूर विभाग ३० मुले (१५ मुले आणि १५ मुली).

केवळ जुलै २०२१ मध्ये ७३ मुलांची (४७ मुले आणि २६ मुली) सुटका करण्यात आली आणि  त्यांच्या पालकांसोबत पुन्हा एकत्र आणण्यात आले. यापैकी एका प्रकरणात  २४ जुलै रोजी कर्तव्यावरील ट्रेन तिकीट परीक्षक (टीटीई) नरेंद्र मिश्रा यांना एक १७ वर्षांची, अल्पवयीन मुलगी ट्रेन क्र. 03201 मध्ये कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान एकटी प्रवास करताना आढळली.  लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचल्यावर, टीटीईने तिला ड्युटीवर असलेल्या महिला आरपीएफ  बी. पाटीदार आणि चाईल्डलाइन संस्थेच्या शारदा कांबळे यांच्याकडे सोपवले.  चाइल्ड लाइन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरपीएफ उपनिरीक्षक बबलू कुमार यांनी तीची चौकशी केली असता तीने तिचे नाव शीतल (नाव बदलले आहे) असल्याचे सांगितले.  ती बिहारच्या पाटणा येथे राहते आणि मुंबईत मॉडेलिंग, अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता घरातून पळून आली असल्याचेही तीने सांगितले.  पुढील कारवाईसाठी चाइल्डलाइन कर्मचारी  शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी या मुलीला बालसुधार गृह, डोंगरी यांच्याकडे पाठवण्यात आले.

 दुसऱ्या एका घटनेत, मेहबूबनगर जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईने तिला फटकारल्यानंतर  घरातून पळून  विशेष ट्रेन क्र.  06524 निजामुद्दीन- पुणे यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीने आली.  आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल पी श्रीवास यांना  14 जुलै रोजी हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ती सापडली.  चौकशी केल्यावर मुलीने तिचे नाव गीतांजली (नाव बदलले) उघड केले ती फक्त तेलगू बोलू शकते.  तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला.  त्यानंतर, आरपीएफ कॉन्स्टेबल जाधव आणि लेडी कॉन्स्टेबल पी श्रीवास यांनी पुढील कारवाईसाठी मुलीला साथी या सामाजिक संस्थेकडे सोपवल्याचे जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंcentral railwayमध्य रेल्वेPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे