एटीएम कार्डची अदलाबदल करून उल्हासनगरच्या तरुणांची ४० हजारांची फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: December 6, 2022 17:45 IST2022-12-06T17:44:55+5:302022-12-06T17:45:41+5:30
अनोळखी तरुणाने हातचलाखीने केली होती अदलाबदल

एटीएम कार्डची अदलाबदल करून उल्हासनगरच्या तरुणांची ४० हजारांची फसवणूक
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-३ शांतीनगर येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये रविवारी सायंकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणांचे एटीएम कार्ड अनोळखी तरुणाने हात चलाखीने अदलाबदल करून ४० हजाराने फसवणूक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर शांतीनगर मध्ये राहणाऱ्या लक्ष्मी प्रदीप उबाळे यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड आहे. उबाळे यांच्या बहिणीचा मुलगा रोहित डांगे याला एटीएम कार्ड देऊन शेजारील एटीएम मध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता पैसे काढण्यासाठी पाठविले. रोहित याने १० हजार रुपये एटीएम मधून काढल्यावर, तेथे उपस्थित असलेल्या एका इसमाने हात चलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर ४० हजार रुपये काढून रोहित डांगे याची फसवणूक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.