शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! पाळणाघरातील ४ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 21:42 IST

5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

ठळक मुद्देमाणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने ठाणे शहरात संताप व्यक्त होत आहे.रविवारी सकाळी या मुलीच्या आईने तिला नेहमीच्या पाळणाघरात नेऊन सोडले आणि ती कामाला निघून गेली.

ठाणे -  पाळणाघरातील एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दशरथ कांबळे (42) या सुरक्षा रक्षकाला बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलिसांनीअटक केली आहे. त्याला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने ठाणे शहरात संताप व्यक्त होत आहे.ही चार वर्षांची मुलगी यशोधननगर भागातील एका पाळणाघरात असताना एका बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या कांबळे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 29 सप्टेंबर 2019 रोजी घडली. रविवारी सकाळी या मुलीच्या आईने तिला नेहमीच्या पाळणाघरात नेऊन सोडले आणि ती कामाला निघून गेली. कांबळे हा तिथून जवळच असलेल्या एक एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. तो या पाळणाघरात आला आणि गंमत दाखवतो, तुझा अभ्यास घेतो, असे अमिष दाखवून तिला आपल्याबरोबर यायला सांगितले. ती त्याच्या मागे गेली तेव्हा त्याने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संध्याकाळी आईबरोबर घरी गेली तेव्हा ती घाबरलेली होती. आईला तिच्या वागण्यात बदल जाणवला. तिने विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. तेव्हा तिच्या आईने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणे पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली. पुढचा तपास पोलीस करत आहेत. पण या घटनेमुळे ठाण्याच्या यशोधन नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकthaneठाणे