उल्हासनगरात ४ वर्षाच्या मुलाचा नाल्यात पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:24 AM2021-07-19T00:24:19+5:302021-07-19T00:24:39+5:30

महापालिका अग्निशमन दल व आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके व अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतल्यावर नदीच्या थांबत्या पाण्यातील खड्ड्यात मुलगा सापडला. उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णलायात नेले असता, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

4 year old boy dies after falling into nala in Ulhasnagar | उल्हासनगरात ४ वर्षाच्या मुलाचा नाल्यात पडून मृत्यू

उल्हासनगरात ४ वर्षाच्या मुलाचा नाल्यात पडून मृत्यू

Next

उल्हासनगर : कॅम्प नं-३ शांतीनगर येथील गाऊपाडा परिसरातील वालधुनी नदीच्या काठावर राहणाऱ्या गुप्ता यांचा ४ वर्षाचा मुलगा रुद्र रात्री ७ वाजण्याच्या दरम्यान लघुसंकेसाठी गेला. त्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला. 

नदीचे पाणी परिसरात आल्याने, नदीच्या थांबत्या पाण्यातील खोल खड्ड्यात पडला. घरा बाहेर गेलेला मुलगा परत न आल्याने आई, वडील व नातेवाईकांनी शोधाशोध करून महापालिका अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिका अग्निशमन दल व आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके व अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतल्यावर नदीच्या थांबत्या पाण्यातील खड्ड्यात मुलगा सापडला. उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णलायात नेले असता, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

Web Title: 4 year old boy dies after falling into nala in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app