शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

समशेरपूर दुहेरी हत्याकांडातील ४ आरोपींना अटक; ५ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 18:35 IST

Crime News : धम्मापाल याचा मारेकरी असलेला दिपकराज मरण पावला; परंतु दिपकराज याच्या मारेकऱ्याचा शोध घेत पोलीसांनी १ जुलै रोजी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली.

- संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील समशेरपूर येथे प्रेम प्रकरणातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील ४ आरोपींना ग्रामीण पोलीसांनी १ जुलै रोजी अटक केली. सदर हत्याकांड ३० जून रोजी तालुक्यातील समशेरपूर येथे सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडले.         ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर येथे ३५ वर्षीय युवक धम्मापाल उर्फ आदेश महादेव आटोटे याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. घटने नंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी त्याचा मारेकरी असलेला दिपकराज सहदेव डोंगरे (५३) राहणार प्रतिक नगर मूर्तिजापुर, याला लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली, यात दिपकराज हा गंभीररीत्या जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते, अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. धम्मापाल याचा मारेकरी असलेला दिपकराज मरण पावला; परंतु दिपकराज याच्या मारेकऱ्याचा शोध घेत पोलीसांनी १ जुलै रोजी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली. सदर हत्याकांड हे प्रेम प्रकरणातून घडले असल्याचे मृतक धम्मपाल याचा भाऊ विनोद आटोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्या उलट मृतक दिपकराज डोंगरे याच्या मुलीची फिर्याद पोलीसांनी ३० जून रोजी पोलीसांनी नोंदवून घेतली, मृतक धम्मपाल याने तुमच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे असे म्हटले, त्यावर दिपकराज याने तु माझ्या मुलीला त्रास का देतो, तुझे लग्न झालेले आहे, तिचा नाद सोडून दे, असे म्हटले असता धम्माल याने जमाव करुन माझ्या वडिलांना विनोद आटोटे, महादेव आटोटे, इंदुबाई आटोटे, आणखी ८ ते १० जणांनी लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी  पोलिसांनी संतोष नागोराव आटोटे (४५), प्रभाकर जानराव आटोटे (३०), विजय लाला आटोटे (३३), जितेंद्र शत्रुघ्न आटोटे (३३) या चार आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांची ५ जुलै पर्यंत  पोलीस कोठडीत रवानगी केली आली आहे. असे घडले हत्याकांड

दिपकराज डोंगरे हे हत्या करण्याच्या उद्देशाने सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास मूर्तिजापूरहून समशेरपूर येथे पोहोचून धम्माल याच्या घरी गेले, तेव्हा धम्मपाल चा भाऊ बाहेर उभा होता, तर धम्मपाला काही कार्यकर्ते भेटायला येणार होते म्हणून तो घरात बिछायत करीत होता धम्मपालला काही कळायच्या आत दिपकराज याने त्याच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकले तो रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाला. काय प्रकार झाला म्हणून विनोद हा बघायला गेला झडापटीत विनोदीही जखमी झाला. दरम्यान दिपकराज हत्या करुन पळ काढत असतानाच गावातील काही लोकांनी त्याला घेरून लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत काही तासातच त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी