शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये चोर समजून तरुणाची मारहाण करून हत्या, ४ आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 19:32 IST

Crime News : नवघरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या समोरील महापालिका मैदानात एका तरुण पडलेला असल्याची माहिती पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळाली.

मीरारोड - चोर समजून एका तरुणास बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना भाईंदर पूर्वेच्या इंदिरा नगर भागात शनिवारी पहाटे घडली आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा प्रकारे कोणाला मारहाण करू नका, पोलिसांना कळवा असे आवाहन केलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवघरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या समोरील महापालिका मैदानात एका तरुण पडलेला असल्याची माहिती पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील तरुणाची ओळख पटवली असता त्याचे नाव सुरजभान सोनी ( २४ ) रा. गोरेगाव मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद पाटील व पथकाने त्वरित तपास करत काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यातील चार तरुणांनी चोर समजून सोनीची लाकडी पट्ट्या व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. आरोपी हे इंदिरा नगरमध्येच राहणारे असून सर्व १९ ते २२ वयोगटातील आहेत.

पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास सदर आरोपीना सोनी हा स्मशानभूमीच्या मागील भागात बसलेला दिसला. त्याला चोर समजून आरोपींनी बळजबरी पकडून मैदानात आणले व तेथे त्याची बेदम मारहाण करत हत्या केली. आरोपीना त्याच भागात राहणारा एक मोबाईल चोर सुद्धा तेथे असल्याचा दिसल्याने सोनी सुद्धा चोर आहे समजून हत्येपर्यंत प्रकार गेला. पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ पुढील तपास करत आहेत. सोनी हा पूर्वी भाईंदरला राहत होता. परंतु तो सध्या गोरेगावला नातलगांकडे राहत होता. त्यामुळे येथे  कशासाठी आला होता? याचे कारण अजून कळू शकलेले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक