महिलेच्या अमिषाने क्रिप्टोकरन्सीत बुडाले ३६ लाख; सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 07:03 PM2023-06-18T19:03:03+5:302023-06-18T19:18:11+5:30

या महिलेच्या अमिषाला बळी पडून मोबाईल वापाऱ्याने एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून तब्बल ३६ लाख रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले होते.

36 lakhs sunk into cryptocurrency by woman's greed; Cyber police recovered | महिलेच्या अमिषाने क्रिप्टोकरन्सीत बुडाले ३६ लाख; सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत

महिलेच्या अमिषाने क्रिप्टोकरन्सीत बुडाले ३६ लाख; सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत

googlenewsNext

ठाणे - येथील एका मोबाईल दुकानाच्या मालकास क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणूक करुन तब्बल ३६ लाख रुपयांची लुट करण्यात आली होती. मात्र, तब्बल १ वर्षानंतर सायबर सेलच्या मदतीने या मोबाईल दुकानदारास संपूर्ण रक्कम परत मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी एका चीनी नागरिकास अटकही केली आहे. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तांच्या सायबर विभागाने या घटनेचा संपूर्ण तपास केला. त्यामध्ये, चीनी नागरिकाचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर, त्यास अटक करण्यात आली. 

एमबीवीवी सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक सुजीत कुमार गुंजकर यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२२ मध्ये व्यापाऱ्यांशी संलग्नित एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर पीडित व्यक्तीला क्रिप्टोकरन्सीचे लालच दाखवण्यात आले. या ग्रुपची अॅडमिन एक महिला होती, जिने संबंधित व्यापाऱ्यास क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं अमिष दाखवलं, तसेच चांगले रिटर्न्स देण्याचं आश्वासनही दिलं होतं. 

या महिलेच्या अमिषाला बळी पडून मोबाईल वापाऱ्याने एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून तब्बल ३६ लाख रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले होते. ३९,५९६ अमेरिकी डॉलरची ही गुंतवणूक होती. दरम्यान, गतवर्षी मे महिन्यात हा व्हॉट्सअप ग्रुप बंद झाला. तर, अनेकदा प्रयत्न करुनही संबंधित ग्रुपच्या अॅडमिनसोबत संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे, आपली फसवणूक झाल्याचे पीडित फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर, मोबाईल दुकानदाराने सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. 

फिर्यादीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी, त्यांना ओकेएक्स (OKX) नावाच्या एका एजन्सीचा तपास लागला. जी एजन्सी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचं काम करत होती. याच तपासादरम्यान पोलिसांना एका फेक क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा शोध लागला. पोलिसांनी ओकेएक्स एजन्सीशी संपर्क केला असता हा वॉलेट एका चीनी नागरिकाचा असल्याचे उघडकीस आले. तसेच, पीडित फिर्यादी व्यक्तीस ज्या मोबाईल नंबरवरुन संपर्क करण्यात आला होता, ते नंबरही हाँगकाँगचे असल्याचे पोलीस तपासात निष्पण्ण झाले. त्यानंतर, पोलिसांनी ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करुन चीनी नागरिकास अटक केली.    

Web Title: 36 lakhs sunk into cryptocurrency by woman's greed; Cyber police recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.