शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी घेतली ३० हजाराची लाच; एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:31 IST

ही कारवाई कामगार कार्यालय परिसरातच झाली.

जळगाव : जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचा शिपाई गोपाळ कडू चौधरी (वय ५५, रा.जुना खेडी रोड, जळगाव) याला ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल. ही कारवाई सोमवारी दुपारी कामगार कार्यालय परिसरातच झाली.

 तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांनी जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळावी म्हणून अर्ज सादर केला होता. या नोकरीची ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात गोपाळ चौधरी याने तक्रारदाराकडे २ लाख १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये देण्याचे सोमवारी ठरले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपअधीक्षक शशिकांत पाटील, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदिप पोळ यांच्या पथकाने दुपारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय  परीससरात सापळा लावला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौधरीला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव