शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

12 किलो स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना अटक, 'या' शहरात साखळी बॉम्बस्फोटचा रचला होता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:19 IST

ATS Arrested 3 terrorist : या प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. यासोबतच पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाचीही मध्य प्रदेशात नोंद आहे.

जयपूर - राजस्थान पोलिसांनी चित्तोडगड जिल्ह्यातील निंबाहेरा शहरात एका वाहनातून 12 किलो स्फोटक सामग्री जप्त केली असून या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. यासोबतच पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाचीही मध्य प्रदेशात नोंद आहे.12 किलो स्फोटकांसह 'या' वस्तू जप्त करण्यात आल्या आहेतपोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक आणि विशेष टास्क फोर्स (ATS-SOG) यांनी गुरुवारी एका निवेदनात ही माहिती दिली. त्यानुसार निंबाहेरा शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान एका संशयास्पद वाहनाला अडवून त्याची झडती घेतली असता त्यात एकूण 12 किलो स्फोटके, बॅटरीसह तीन चालणारे घड्याळ आणि वायरसह तीन कनेक्टर आदी साहित्य जप्त करण्यात आले.एटीएस आरोपींची चौकशी करत आहेपोलिसांनी स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तपास करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, या संदर्भात तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर इतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यापैकी दोनजण मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी आहेत, त्यांची तिथली एटीएस चौकशी करत आहे. राजस्थानमध्ये अटक करून ताब्यात घेतलेल्या आरोपींना जयपूरला आणण्यात आले आहे.सिरीयल स्फोटाची कट आखण्यात आला होता प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी जयपूरमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत होते, त्यासाठी चित्तोडगडच्या निंबाहेरा येथे बॉम्ब बनवण्याचे काम सुरू होते. आरोपींची ओळख उघड करण्यात आलेली नाही आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. या तिघांचाही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना आणि एटीएसचा संशय आहे, मात्र आतापर्यंत आरोपींनी कोणत्याही दहशतवादी संघटनेचे नावही घेतलेले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादीAnti Terrorist SquadएटीएसArrestअटकRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश