उल्हासनगरात एका इसमाची ३ लाखांना फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 13:10 IST2022-03-18T13:10:14+5:302022-03-18T13:10:56+5:30
खोटी मोत्याची माळ खरी असल्याचे भासवून विक्री

उल्हासनगरात एका इसमाची ३ लाखांना फसवणूक
- सदानंद नाईक
उल्हासनगर : मोत्याची खोटी माळ खरी असल्याचे भासवून दिनेश जैन यांना राजू नावाच्या इसमाने ३ लाखाला विकून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर मध्ये राहणारे दिनेश बाबूलाल जैन यांच्यासी राजू नावाच्या इसमाने सुरवातीला ओळख वाढविली. जैन यांचा विश्वास संपादन केल्यावर खोदकामात एक मोत्याची माळ सापडल्याचे सांगितले. जैन यांनी विश्वासाने मोत्याची माळ ३ लाख रुपयांचा खरेदी केली. मात्र नंतर मोत्याची माळ खोटी असल्याचे उघड होऊन आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन राजू नावाच्या इसमा विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजू नावाच्या इसमावर गुरवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास