कुरेशीने केलेला विसावा गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:11 IST2018-10-20T06:11:07+5:302018-10-20T06:11:13+5:30

दोन हत्यांनंतरची २०१० मधील घटना : मुलीच्या विरोधामुळे काढला होता पळ

2oth crime made by Qureshi | कुरेशीने केलेला विसावा गुन्हा उघड

कुरेशीने केलेला विसावा गुन्हा उघड

नवी मुंबई : सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशीवरील विसावा गुन्हा उघड झाला आहे. नेहरूनगर येथील दोन हत्यांनंतर २०१० मध्येच त्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता; परंतु मुलीने आरडाओरडा केल्याने त्याला पळ काढावा लागला आणि त्यामुळे तिच्यावरील अतिप्रसंग टळला होता.


अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रेहान कुरेशी (३४) याच्यावरील २० गुन्हे उघड झाले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या १७ गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून २०१० मध्ये त्याने केलेल्या हत्येचे दोन गुन्हे उघड केले आहेत.
पाच व आठ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचारानंतर त्याने त्यांची हत्या केली होती. तब्बल आठ वर्षांनी हे दोन्ही गुन्हे उघड झाल्यानंतर कुर्ला परिसरातच त्याने केलेला पॉक्सोचा आणखी एक गुन्हा समोर आला आहे. यामुळे त्याच्यावरील एकूण २० गुन्हे उघड झाले आहेत.


सुदैवाने या गुन्ह्यात मुलीने त्याला प्रतिकार करून आरडाओरडा केल्याने कुरेशी याने तिथून पळ काढला होता. रेहान याने अशा प्रकारे इतरही अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 2oth crime made by Qureshi