आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा
By संतोष भिसे | Updated: April 28, 2024 15:57 IST2024-04-28T15:56:55+5:302024-04-28T15:57:13+5:30
हणमंत नामदेव पाटील (रा. पणुंब्रे तर्फ वारुण, ता. शिराळा) यांनी फिर्याद दाखल केली.

आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा
शिराळा : रेड (ता. शिराळा) येथील एका संस्थेची २७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव (कर्नाटक) येथील शक्ती सेल्स कार्पोरेशनचे व्यवस्थापक बाजीराव सदाशिव घोरपडे, सुनील गिड्डे आणि प्रसाद सुगते यांच्याविरुद्ध शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नोव्हेंबर २०२२ ते ५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हणमंत नामदेव पाटील (रा. पणुंब्रे तर्फ वारुण, ता. शिराळा) यांनी फिर्याद दाखल केली. संशयित घोरपडे, गिड्डे, सुगते यांनी त्यांना आयटीआय सुरु करण्यासाठी त्यांच्या कंपनीतर्फे संकेतस्थळावरील सर्व तांत्रिक माहिती भरून देतो असे आश्वासन दिले. आयटीआयसाठीची सर्व प्रकारची यंत्रे, उपकरणे, तांत्रिक सल्ला व अन्य बाबी पुरवतो असेही सांगितले. त्यासाठी २५ लाख ९० हजार रुपये धनादेशाद्वारे व १ लाख ४० हजार रुपये रोख असे २७ लाख ३० हजार रुपये घेतले. पण त्यांनी संस्थेला कोणतेही साहित्य पुरवले नाही.
हणमंत पाटील यांनी पैसे परत मिळावेत यासाठी पाठपुरावा केला, तेव्हा संशयितांनी पैशांच्या परतफेडीपोटी धनादेश दिला, पण तो वटला नाही. त्यामुळे पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली.