शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या आयुष्यात आली दुसरी व्यक्ती, तरूणाने स्वत:वर झाडली गोळी; फेसबुकवर व्यक्त केलं दु:खं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 12:49 IST

Crime News : "मी जे काही करत आहे ते माझ्या मर्जीने करत आहे. माझं गेल्या 10 वर्षांपासून एका दुसऱ्या समाजाच्या मुलीसोबत अफेअर होतं. मी तिला शिकवलं आणि तिच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या....

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बस्तीमध्ये (Basti Suicide Case) प्रेमात दगा मिळालेल्या एका 26 वर्षीय तरूणाने वडिलांच्या लायसन्स रिवॉल्वरने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्याआधी  तरूणाने 4 मिनिटांचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता. व्हिडीओतमध्ये तरूणाने सांगितलं की, त्यांचं दुसऱ्या समाजाच्या तरूणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. पण ती नेहमीच त्याचं आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण करत होती. अशात तिचं दुसऱ्या तरूणासोबत अफेअर सुरू झालं. आता दोघेही त्याला मारण्याचा प्लान करत आहेत. त्यामुळे तो स्वत:च आत्महत्या करत आहे. 

ही घटना आरजानीपूर गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षाय सुनील कुमार मौर्यच्या वडिलांचं बाजारात ऑटो पार्ट्सचं दुकान आहे. सुनील इथे वडिलांना मदत करतो. सोमवारी दुपारी 12 वाजता तो दुकानातून आरजानीपूर गावात काही कामासाठी आला होता. त्याने वडिलांना सांगितलं की, तो गोदाममध्ये जात आहे. पण जेव्हा तो परत आला नाही तर त्याच्या वडिलांनी दुकानात काम करणाऱ्या तरूणाला गोदामात पाठवलं. 

तरूणाने अनेक वेळा गोदामचा दरवाजा वाजवला. पण सुनीलने दरवाजा उघडला नाही. तरूणाने याची सूचना त्याच्या वडिलांना दिली. ते जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना सुनीलचा मृतदेह आढळून आला. त्याने डोक्यावर गोळी झाडली होती. सोबतच बाजूला रिवॉल्वरही पडली होती. 

लगेच याची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. घटनेची चौकशी सुरू केली तेव्हा त्याची फेसबुक पोस्ट आढळून आली. त्याने दुसऱ्या समाजाच्या तरूणीला आत्महत्येसाठी भाग पाडण्यासाठी जबाबदार धरलं आहे.

सुनील व्हिडीओत म्हणाला की, "मी जे काही करत आहे ते माझ्या मर्जीने करत आहे. माझं गेल्या 10 वर्षांपासून एका दुसऱ्या समाजाच्या मुलीसोबत अफेअर होतं. मी तिला शिकवलं आणि तिच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या. तिने लग्नाच्या आणि प्रेमाच्या नावावर माझं शोषण केलं. दरम्यान तिचं नोएडाच्या एका तरूणासोबत अफेअर सुरू झालं. मग ती मला इग्नोर करू लागली. तिने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. ती म्हणाली की, तू हिंदू आहे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. आता ती आणि तिचा मला मारण्याचा प्लान करत आहेत. मी आज नाही तर उद्या मारला जाणार. त्यामुळे मी स्वत:च माझं जीवन संपवत आहे".

पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. सोबतच प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जात आहे. ज्या तरूणीचा तरूणाने उल्लेख केला तिचीही चौकशी केली जाणार.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी