शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

२५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी केला गँगरेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 17:26 IST

Gangrape Case : झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे. 

ठळक मुद्देजमशेदपूरजवळ पटमदा या पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात सोमवारी उशिरा ही खळबळजनक घटना घडली.

रांची : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे. 

जमशेदपूरजवळ पटमदा या पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात सोमवारी उशिरा ही खळबळजनक घटना घडली. पीडित युवती आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाली  होती. इतक्यात पाच आरोपींनी रस्त्यात दोघांची वाट अडवली. त्यानंतर मित्राला मारहाण करुन त्यांनी घटनस्थळाहून पळवून लावले. तरुणीला एका तलावाजवळ नेऊन पाचही जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

रात्री १० वाजण्याच्या सुमारास तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर पोलीस ठाणं गाठून तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सकाळ उजाडण्या आधीच पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी धनराज महतो उर्फ राज (२२), हरि महतो (३०), रंजीत महतो (२७), कालू महतो (२४) बुलेट महतो (२८) या पाच जणांना अटक करुन न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

 

टॅग्स :ArrestअटकJharkhandझारखंडPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण