शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२५  हजारांची लाच; वाशिमच्या ठाणेदारासह ‘रायटर’ला अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 17:12 IST

वाशिम : शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय ५०) यांना २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

ठळक मुद्दे याप्रकरणी पोलीस निरिक्षक विजय गोवर्धन पाटकर (वय ५१) यांनाही आरोपी करण्यात आल्याची माहिती अमरावती एसीबीच्या पथकाने दिली.आरोपीला मदत करण्यासाठी ठाणेदार विजय पाटकर यांनी त्यांचे रायटर विजय राठोड याच्यामार्फत २५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार. तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यास रंगेहात ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय ५०) यांना २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस निरिक्षक विजय गोवर्धन पाटकर (वय ५१) यांनाही आरोपी करण्यात आल्याची माहिती अमरावती एसीबीच्या पथकाने दिली. हा प्रकार ६ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. वाशिम शहर पोलीस स्टेशनअंतर्गत काही दिवसांपूर्वी खडसे नामक एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यापूर्वी खडसे यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. त्यावरून पोलीसांनी भादंवी ३०६ अन्वये आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याच घटनेतील आरोपीला मदत करण्यासाठी ठाणेदार विजय पाटकर यांनी त्यांचे रायटर विजय राठोड याच्यामार्फत २५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार  अमरावती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली. यासंदर्भात १९ जून रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यात सत्यता आढळून आली. दरम्यान, ६ जुलै रोजी लाचेची रक्कम देण्याचे ठरले असता, अमरावती एसीबीच्या पथकाने शहर पोलीस स्टेशनच्या आवारातच सापळा रचला. यावेळी हवालदार विजय राठोड याने तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यास रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस निरिक्षक विजय पाटकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती विभागाचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, चेतना तिडके, पोलीस उपअधिक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात अमरावती येथील एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी  केली.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाPoliceपोलिस