शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

अतिरेकी संघटनेशी संबंध, बोईसरमधून २४ वर्षीय तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 08:39 IST

हमराजने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला असून गेली तीन वर्षे ताे सौदी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला होता.

पंकज राऊत/हितेन नाईकपालघर/बोईसर : अल कायदा आणि आयसिसशी संबंध असल्याच्या सबळ पुराव्याच्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बोईसरच्या सोमनाथ पॅराडाइज कॉम्प्लेक्समध्ये राहत असलेला उच्चशिक्षित तरुण हमराज शेख (वय २४) यास अटक केली आहे. बोईसर पोलिस ठाण्यात त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आले आहे. 

हमराजने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला असून गेली तीन वर्षे ताे सौदी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला होता. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तो भारतात परतला होता. सौदीतील मुक्कामात तो आयसिसच्या संपर्कात आला होता. मुंबईत आल्यानंतर तो बंगळुरू येथून अटक केलेल्या मोहंमद आरिफ याच्या संपर्कात होता. आयसिसने चालवलेल्या ऑनलाइन मोहिमेत भाग घेत तो अन्य काही जणांच्याही संपर्कात होता. 

हमराज यास पोलिसांनी शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बोईसर येथील अवधनगरमधील त्याच्या वडिलांच्या दुकानातून ताब्यात घेतले. त्याच्या फ्लॅटची पोलिसांनी तपासणी केली. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बोईसर पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू होती. त्याच्याकडून मोबाइल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे.

३० वर्षांपासून कुटुंबाचे वास्तव्यहमराज शेखचे कुटुंब ३० वर्षांपासून बोईसर येथे राहत असून त्याच्या वडिलांचे अवधनगर येथे चपलांचे दुकान आहे. हमराजचे माध्यमिक शिक्षण चिन्मया स्कूल येथे तर दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण टीव्हीएम स्कूल, बोईसर येथे झाले आहे. त्याने डहाणूतील रुस्तमजी स्कूलमधून हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे. शिक्षणानंतर तो केरळ आणि सौदी अरेबिया येथे तीन वर्षे नोकरीसाठी गेला होता. नोव्हेंबर महिन्यात भारतात परतल्यानंतर आपल्या वडिलांना तो दुकानात मदत करीत होता. 

टॅग्स :ISISइसिसTerrorismदहशतवादPoliceपोलिस