Crime News Kalyan: कल्याणात चाॅपरने वार करून तरुणाची हत्या; मारेकऱ्याचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 20:15 IST2021-10-08T20:14:56+5:302021-10-08T20:15:43+5:30
Crime News Kalyan: खडकपाडा पोलीस ठाण्यात शेर खान नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्याला अटक झाली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Crime News Kalyan: कल्याणात चाॅपरने वार करून तरुणाची हत्या; मारेकऱ्याचा शोध सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना कल्याणमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाची चाॅपरने सपासप वार करून हत्या करण्यात आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरुवारी ७ तारखेला रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण येथील गोदरेज हॉललगत रोजली सोसायटीजवळ साई उद्यान गार्डन परिसरात ही घटना घडली.
मुकेश देसाईकर असं मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र देसाईकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात शेर खान नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मारेकऱ्याला अटक झाली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.