शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील २१ वर्षीय युवतीवर धावत्या लक्झरी बसमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 16:33 IST

Girl raped in Luxury Bus युवतीवर आरोपी समिर याने दोन वेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले.

ठळक मुद्देपिडीत युवती नागपुर येथुन गुडविल ट्रॅव्हल्सने (स्लिपर कोच)  पुणे येथे परत निघाली होती.ट्रॅव्हलचा क्लिनर समीर देवकर (वय २५ रा. सिताबर्डी , नागपुर) हा पिडीत युवतीच्या शेजारी बसला.समिर याने पिडीत युवतीचे तोंड दाबुन धरून चाकुचा धाक दाखवला.

वाशिम : नागपुर ते पुणे मार्गावर धावणाºया खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लिनरनेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना ११ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्री दरम्यान घडली.गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती ही पुणे येथील एका खासगी कंपणीत (एमआयडीसी परिसर) नोकरी करते. पिडीत युवती ही तिच्या बहिण्याच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती. बहिणीचे लग्न आटोपुन ५ जानेवारीला दुपारी ४:३० वाजता नागपुर येथुन गुडविल ट्रॅव्हल्सने (स्लिपर कोच)  पुणे येथे परत निघाली होती.प्रवासादरम्यान ट्रॅव्हलचा क्लिनर समीर देवकर (वय २५ रा. सिताबर्डी , नागपुर) हा पिडीत युवतीच्या शेजारी जाऊन तिच्याशी बिलगला असता युवतीने ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु  समिर याने पिडीत युवतीचे तोंड दाबुन धरून चाकुचा धाक दाखवला. जीवाच्या भितीने घाबरलेल्या युवतीवर आरोपी समिर याने दोन वेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले. ६ जानेवारीला ही ट्रॅव्हल्स सकाळी पुणे येथे पोहचल्यावर पिडीत युवतीने तीच्या एका मित्राला फोन करून आपबिती सांगितली. त्यानंतर पिडीत युवती आणी तिच्या मित्राने पुणे येथील ग्रामीण पोलीस स्टेशन गाठुन फिर्याद नोंदविली. या फिर्यादीनुसार समिर देवकर याचेविरूध्द भादंविचे कलम ३७६ (२) (एन) ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.घटनास्थळ हे मालेगाव बाय पास (जि. वाशिम) असल्याने पुणे ग्रामीण पोलीसांनी सदर प्रकरण मालेगाव पोलीस स्टेशनला वर्ग केले. मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पुष्पलता वाघ यांचेकडे दिला. तपास अधिकारी वाघ यांनी यु.पी. ७३ ए ८०२० क्रमांक असलेली गुडविल ट्रॅव्हल्स कंपनीची बस जप्त करून ज्या बर्थवर ही घटना घडली त्या बर्थवरील कपडे जप्त केले. या घटनेतील आरोपी युवक हा घटनेच्या दिवशीपासुन पसार झालेला आहे. मालेगाव पोलीसांचे एक पथक आरोपीच्या शोधात पाठविण्यात आल्याचे ठाणेदार सोनोने यांनी सांगिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारwashimवाशिमnagpurनागपूरPuneपुणे