शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

२० लाखांचे लाच प्रकरण, महिला पीएसआय अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 03:10 IST

आरोपीवर समाजविरोधी कारवाया प्रतिबंधक कायद्याचे कलम न लावण्यासाठी तिने ही लाच मागितली होती.

ठळक मुद्दे २० लाख रुपयांची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता जाडेजा हिला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. २०१९ मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात केनल शहा याची चौकशी श्वेता जाडेजा ही करीत होती.

अहमदाबाद : बलात्कार प्रकरणातील आरोपीवर समाजविरोधी कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली आरोप न लावण्यासाठी २० लाख रुपयांची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता जाडेजा हिला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. जाडेजा ही अहमदाबाद (पश्चिम) महिला पोलीस ठाण्याची प्रभारी आहे. २०१९ मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात केनल शहा याची चौकशी श्वेता जाडेजा ही करीत होती. केनल शहा याच्या भावाकडे तिने ३५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे पोलिसांनी सांगितले. केनल शहा याच्यावर समाजविरोधी कारवाया प्रतिबंधक कायद्याचे कलम न लावण्यासाठी तिने ही लाच मागितली होती. या कलमाखालील आरोपीला पोलीस त्याच्या मूळ जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या तुरुंगात पाठवू शकतात. शहर गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपशिलानुसार श्वेता जाडेजा हिने मध्यस्थामार्फत २० लाख रुपये घेतले आणि केनल शहा याच्याकडे राहिलेले १५ लाख रुपये मागितले. तक्रारदाराने जाडेजा हिला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २० लाख रुपये दिले.राहिलेल्या रकमेसाठी ती तगादा लावत होती. जाडेला हिला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आली. तिला शनिवारी सत्र न्यायालयाने तीन दिवसांच्या कोठडीत पाठवले. पोलिसांनी तिची सात दिवसांची कोठडी मागितली होती, असे सरकारी वकील सुधीर ब्रह्मभट्ट यांनी सांगितले.पैसे मिळवण्याचे आव्हानश्वेता जाडेजा हिने घेतलेले २० लाख रुपये परत मिळवणे हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न आहे. तपासामध्ये मध्यस्थाने २० लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे, असे ब्रह्मभट्ट म्हणाले.अहमदाबादमधील क्रॉप सोल्युशन कंपनीचा केनल शहा हा व्यवस्थापकीय संचालक असून, त्याच्यावर बलात्काराचे दोन स्वतंत्र आरोप आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

 

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसGujaratगुजरातArrestअटकRapeबलात्कार