शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विष प्रयोग करुन २० श्वान आणि ७ मांजरांचा घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 21:03 IST

हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्दे या प्रकारामुळे परिसरातील २० श्वान आणि ७ मांजरींचा मृत्यू झाला आहे. नेमका हा प्रकार का करण्यात आला याचा देखील तपास पोलीस करित आहेत.

अंबरनाथ - अंबरनाथ येथील स्टेशन परिसरातील भीमनगर भागात सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने खाद्यपदार्थातून या परिसरातील भटके कुत्रे आणि मांजरींना विष प्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील २० श्वान आणि ७ मांजरींचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भीमनगर भागात हा सर्व प्रकार घडला आहे. सकाळी स्थानिक रहिवाशांना चार ते पाच कुत्रे हे परिसरात मृत अवस्थेत आढळले. हा प्रकार कोणालाच गंभिर वाटला नाही. मात्र याच भागातील इतर ठिकाणी देखील काही कुत्रे मृत अवस्थेत असल्याचे लक्षात येताच या भागातील नागरिकांनी मृत कुत्र्यांचा शोध घेतला. तसेच या घटनेची माहिती पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही स्थानिकांनी दिली. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना २० श्वान आणि ७ मांजरी देखील मृत अवस्थेत असल्याचे लक्षात आले. एकाच दिवशी येवढय़ा मोठय़ा प्रमाणात कुत्रे आणि मांजरींचा मृत्यू झाल्याने या प्रकारात विष प्रयोग करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र हा विष प्रयोग कढातुन करण्यात आला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. पाव, ब्रेड किंवा अन्न पदार्थातुन हा विष प्रयोग झाल्याचे समोर येत आहे. मात्र हा प्रकार कोणत्या व्यक्तीने केला हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. नेमका हा प्रकार का करण्यात आला याचा देखील तपास पोलीस करित आहेत. या परिसरातील सर्व कचरा कुंडय़ांमधील अन्न पदार्थ, ब्रेड यांचे नमुने एकत्रित करुन नेमका कोणता विष प्रयोग झाला आहे याची माहिती घेतली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथdogकुत्राPoliceपोलिस