शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागण्यासाठी चिमुकलीचे केले होते अपहरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 21:40 IST

अपहरण करणाऱ्या टोळीतील दोन महिलांना अटक: ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने परभणी येथून गुरुवारी अटक केली. यातील आरोपी महिला ही परभणी येथे असल्याचे आढळून आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनिता भोसले, सीमा पवार आणि तिचा मुलगा यांना ताब्यात घेतले.

ठाणे - ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे भीक मागण्यासाठी अपहरण करणाऱ्या सीमा पवार (35) आणि अनिता भोसले (30) या दोन महिलांसह एका 11 वर्षीय मुलाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने परभणी येथून गुरुवारी अटक केली. या मुलीला शुक्रवारी सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सुखरुप तिच्या आईच्या ताब्यात देण्यात दिले.जालना जिल्ह्यातील पिंपळगाव येथील यमुना रोहित नरवडे (35) ही महिला कामाच्या शोधात ठाण्यात आली होती. तिला एक वर्षीय प्रेम हा मुलगा आणि दोन वर्षाची प्राजक्ता ही मुलगी अशी दोन मुले आहेत. कामधंदा आणि जवळ पैसेही नसल्याने यमुना ठाणो पूर्वेकडील रेल्वे स्थानकाच्या  बाजूला असलेल्या मोकळया जागेतच आपल्या मुलांसह राहत होती. दरम्यान,  26  सप्टेंबर 2019 रोजी ती आपल्या मुलांसह रेल्वे स्थानकासमोरील मोकळया मैदानात झोपलेली असतांना पहाटे 1.45 ते  सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखीने तिच्या जवळील दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये तिने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जगदेव यांनी तपासाला सुरवात केली. चौकशीमध्ये या दोन वर्षाच्या बालिकेच्या अपहरणामागे एक महिला आणि तिचा 11 वर्षाच्या मुलाचा हात असल्याची बाब समोर आली. यातील आरोपी महिला ही परभणी येथे असल्याचे आढळून आले. त्याच माहितीच्याआधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या या तपास पथकाने परभणी येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनिता भोसले, सीमा पवार आणि तिचा मुलगा यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका केल्यानंतर सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी तिच्या आईच्या ताब्यात देण्यात दिले.

टॅग्स :KidnappingअपहरणArrestअटकPoliceपोलिसthaneठाणेBeggerभिकारी