नालासोपाऱ्यात दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला अटक, ४ गुन्ह्यांची केली उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 17:20 IST2023-04-08T17:19:52+5:302023-04-08T17:20:23+5:30
पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांची कामगिरी

नालासोपाऱ्यात दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला अटक, ४ गुन्ह्यांची केली उकल
मंगेश कराळे
नालासोपारा :- दुचाकी चोरी करणाऱ्या दुकलीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल करत चार चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी दिली आहे.
धानिवबाग नाका येथे राहणारा तरुण सलिम युनूस अन्सारी (२१) याची दुचाकी ९ मार्चच्या रात्री राहते घराचे परिसरात पार्किंगमधून चोरटयाने चोरी केली होती. वर नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या अवलोकना मार्फत प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी साजिद सलमानी (२१) आणि आबिद शाह ऊर्फ लंगडा (१९) या दोघांना ६ एप्रिलला ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केल्यावर तो गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात अटक करण्यात आली. अटक आरोपीत यांचेकडे अधिक तपास करुन ४ गुन्ह्यांची उकल करून ४ दुचाकी हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, निखिल मंडलिक यांनी केली आहे.