उस्मानाबादमध्ये घरफोडी करण्यासाठी शहरातून चोरलेल्या कारसह २ आरोपींना लातूरमधून अटक
By रूपेश हेळवे | Updated: November 26, 2022 18:48 IST2022-11-26T18:46:56+5:302022-11-26T18:48:32+5:30
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून काही दिवसापूर्वी एक कार व त्याच दिवशी जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीचा गुन्हा घडला होता.

उस्मानाबादमध्ये घरफोडी करण्यासाठी शहरातून चोरलेल्या कारसह २ आरोपींना लातूरमधून अटक
सोलापूर : उस्मामानाबाद येथे घरफोडी करण्यासाठी सोलापुरमधून कार व दुचाकी चोरणाऱ्या दोघांना लातूरमध्ये अटक करण्यात आली आहे. हरजितसिंग टाक व त्याचा साथीदार सुरजितसिंग टाक ( रा. हडपसर, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेली एक कार व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून काही दिवसापूर्वी एक कार व त्याच दिवशी जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीचा गुन्हा घडला होता. पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी जावून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर कार चोरी करतानावेळी, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली मोटारसायकल वापरल्याचे फुटेजमध्ये दिसून आले होते. त्याच दरम्यान, मोटार सायकल व कार चोरी करणारे दोन इसमांपैकी एक हा आरोपी राज्यातील विविध जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोरी व दरोडा अशा प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार हरजितसिंग टाक ( रा. फुट रस्ता, शेळगी ) असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी हरजितसिंग टाकचे गुन्हे करण्याचे पध्दतीचा अभ्यास केला. तो कोठेतरी मोठी चोरी अथवा दरोडा टाकणार असल्याचा संशय आल्याने त्याबाबत माहिती घेतली असता, तो लातूर येथे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी हरजितसिंग व सुरजितसिंग टाक ( रा. हडपसर, पुणे ) या दोघांना लातूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून चोरलेली कार व मोटारसायकल जप्त करण्यात आले. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त डॉ. दिपाली काळे, डॉ. प्रिती टिपरे सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.