शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

1993 Mumbai Bombing : १९९३च्या बॉम्बस्फोटातील मुनाफला विमानतळावर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 06:16 IST

1993 Mumbai Bomb Blast : गुजरात एटीएसची कारवाई; मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर दोनदा आला होता भारतात

मुंबई : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपी मुनाफ हलारी याला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई विमानतळावरून रविवारी रात्री अटक केली. तो पाकिस्तानी पासपोर्टवर मुंबईतून दुबईला जात असताना ही कारवाई करण्यात आली.

गुजरात एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त के. के. पटेल यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून गुजरात समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात हेरॉईन तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार, २ जानेवारीला गुजरात एटीएसने दीड हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्जसह पाच पाकिस्तानी तस्करांना अटक केली. या आरोपींच्या चौकशीत मुनाफचे नाव समोर येताच तो गुजरात एटीएसच्या रडारवर आला. पथकाने त्याचा शोध सुरू केला.१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत दोन तासांतच १२ ठिकाणी स्फोट झाले. स्फोटांत २५७ जणांचा मृत्यू झाला. तर ७१३ जखमी झाले होते. या भीषण स्फोटांसाठी टायगर मेमनचा खास हस्तक असलेल्या मुनाफने तीन दुचाकी पुरविल्या. यातील एका स्कूटरच्या साहाय्याने झवेरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. तर, अन्य दोन स्कूटर मुंबईतील निगम क्रॉस रोड आणि दादर येथे सापडल्या होत्या. तपासयंत्रणा त्याच्या मागावर होत्या. मात्र मुनाफ त्यांच्या हाती लागला नाही. केंद्रीय तपास यंत्रणेने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती.

रविवारी रात्री तो मुंबई विमानतळावरून पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे दुबईला जाणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळताच त्यांनी सापळा रचून, त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीत, मुंबई बॉम्बस्फोटांनतर मध्य प्रदेशमधील बरेलीमार्गे तो बँकाँकला आला.

मेमनने त्याच्यासाठी पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने अब्दुल मोहम्मद नावाने पाकिस्तानी पासपोर्टसुद्धा बनविला. पुढे, टायगर मेमनच्या सतत संपर्कात असलेला मुनाफ केनियाच्या नैरोबीमध्ये मग्नुम आफ्रिका नावाने ओळख लपवून राहू लागला. मेमनच्या सांगण्यावरून धान्य आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. याआडून तो भारतात ड्रग्ज, स्फोटकांची तस्करी करीत असे. २ जानेवारीला गुजरात एटीएसने पकडलेल्या ड्रग्जसाठी मुनाफने कराचीतील हाजी हसनला हे ड्रग्ज भारतात पाठविण्याचे काम सोपविल्याचे समोर आले. त्यानुसार, गुजरात एटीएस तपास करीत आहेत.मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पसार झालेला मुनाफ दोन वेळा भारतात आल्याची धक्कादायक माहिती गुजरात एटीएसच्या कारवाईतून समोर आली. २०१४ मध्ये अतारी सीमेवरून तो भारतात येऊन पुढे मुंबईत आला. गुजरात एटीएसने त्याच्याकडून पाकिस्तानी पासपोर्ट जप्त केला असून, हा पासपोर्ट पाकिस्तानी यंत्रणेने दोनदा नूतनीकरण केला होता.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमBombsस्फोटके