शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारनं जामिनासाठी घेतली सुप्रीम कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 14:57 IST

सध्या सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा कारागृहात भोगत आहे. 

ठळक मुद्देआज सज्जन कुमारनं तब्येतीचं कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी धाव घेतली आहे.३४ वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यात आली. १ नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती.

नवी दिल्ली - 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आज सज्जन कुमारनं तब्येतीचं कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी धाव घेतली आहे. सध्या सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा कारागृहात भोगत आहे. 

सज्जनला मंडोली कारागृहात बॅरेक क्रमांक 14 मध्ये त्याला ठेवण्यात येणार होते. १७ डिसेंबर रोजी  दिल्ली हायकोर्टानं सज्जन कुमारला शीखविरोधी दंगलीप्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिवाय, गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेशही दिले होते. यानंतर, दरम्यान, सज्जन कुमारनं आत्मसमर्पण करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली हायकोर्टात केला होता.  काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे आत्मसमर्पणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि ३१ डिसेंबर रोजीच आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते.  गेल्या वर्षी १७ डिसेंबरला दिल्ली हायकोर्टानं शीखविरोधी दंगलीप्रकरणात ऐतिहासिक निर्णय देत सज्जन कुमारला दोष ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३४ वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यात आली. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. १ नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमारची सुटका केली. या निकालाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयानं विचारला होता.

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी

1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार

टॅग्स :1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्ली