लातूर : शहरातील जुना औसा रोड परिसरात एका १९ वर्षीय तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत आठ हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रहर्ष महेश चव्हाण (वय १९, रा. गणेश नगर, लातूर) हा १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. जुना औसा रोडवरील नेटीझन क्लासेसजवळ आरोपी रवी कसबे, साईराज उर्फ साया वाघमारे, हनी उर्फ ओम पाटील आणि अनिकेत उर्फ गोविंद राऊत यांनी त्याला गाठले.
मुख्य आरोपी रवी कसबे याने 'तुला पैशाचा माज आला आहे का?' असे म्हणत कमरेचा कोयता काढून प्रहर्षच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रहर्षने प्रसंगावधान राखून वार चुकवला. त्यानंतर इतर तीन आरोपींनी त्याला घट्ट पकडून ठेवले. रवीने कोयत्याचा धाक दाखवून प्रहर्षच्या खिशातील आठ हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले.
याबाबत प्रहर्ष चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३११, ३५२ सह शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि. सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. पाटील हे करत आहेत.दहशत माजवून आरोपी झाले पसार... -मारहाणीदरम्यान आरोपी साईराजने काठीने, तर हनीने कमरेच्या बेल्टने प्रहर्षला बेदम मारहाण केली. अनिकेतने लाथाबुक्क्यांनी मारून त्याला जखमी केले. आरोपींनी उपस्थित नागरिकांनाही कोयता दाखवून धमकावले आणि परिसरात दहशत माजवून तिथून पळ काढला.
Web Summary : In Latur, a 19-year-old was robbed of ₹8,000 after being threatened with a knife. Four individuals have been booked by Shivaji Nagar police following the incident near Juna Ausa Road. The victim was also beaten during the robbery.
Web Summary : लातूर में, 19 वर्षीय एक युवक को चाकू दिखाकर 8,000 रुपये लूट लिए गए। जुना औसा रोड के पास हुई इस घटना के बाद शिवाजी नगर पुलिस ने चार लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। लूट के दौरान पीड़ित को पीटा भी गया।