१९ वर्षीय मुलीने बसमधून उडी मारून केला सोनसाखळी चोराचा पाठलाग अन्...
By पूनम अपराज | Updated: November 2, 2020 21:56 IST2020-11-02T21:55:39+5:302020-11-02T21:56:03+5:30
chain snatcher : ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. अंधेरी पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे.

१९ वर्षीय मुलीने बसमधून उडी मारून केला सोनसाखळी चोराचा पाठलाग अन्...
मुंबई - १९ वर्षीय टेली कॉलर नोकरी करणाऱ्या मुलीने बेस्टच्या बसमधून उडी मारून सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. अंधेरीपोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे.
अंधेरीतील सिप्ज़ परिसरात काम करणाऱ्या संजना बागुल हिच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोनसाखळी बसमधून चोरट्याने लंपास करून चालत्या बसमधून उडी मारून पळाला. तात्काळ चालत्या बसमधून १९ वर्षीय संजनाने सिग्नलला बस स्लो झाल्यानंतर उडी मारली आणि चोराचा पाठलाग केला. थोड्या अंतरावर जाऊन व=चोराने ऑटो रिक्षा पकडली. मात्र, संजना चोरामागून धावून चोर...चोर... असा आरडाओरडा करू लागली. त्यामुळे उपस्थित वाहतूक पोलिसाने ऑटो रिक्षातील चोराला ताब्यात घेतलं आणि अटकेच्या प्रक्रियेसाठी अंधेरी पोलीस ठाण्याकडे दिलं. चोराचं नाव मुकेश गायकवाड (३४) आहे. मुकेश लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाल्यानं चोऱ्या करत होता. अजून अशा प्रकारे त्याने किती गुन्हे केले याचा तपास अंधेरी पोलीस करत आहेत. संजना बागुल म्हणाली की, कष्टाच्या कमाईने घेतलेली सोनसाखळी चोराने चोरल्यानंतर जीव कासावीस झाला. तीच सोनसाखळी परत मिळवण्यासाठी धैर्य दाखवून चालत्या बसमधून उतरले आणि चोराचा पाठलाग केला.