इमारतीवरून पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:55 PM2020-01-12T22:55:26+5:302020-01-12T22:55:37+5:30

खारघर  पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

19-year-old girl dies after falling from a building | इमारतीवरून पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

इमारतीवरून पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Next

पनवेल :खारघर सेक्टर 35 मधील साइस्प्रिंग इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी खारघर मध्ये घडली. मयत तरुणीचे नाव गुरशरण कौर असे आहे.
     या घटनेला खारघर  पोलिसांनी दुजोरा दिला आहे. संबंधित मुलगी ही काळंबोली येथील रहिवासी आहे. साइस्प्रिंग इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. संबंधित घटना कशी घडली यासंदर्भात खारघर पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: 19-year-old girl dies after falling from a building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.