19 lakh cocaine smuggler arrested | पावणे १९ लाखांचे कोकेनसह तस्करास अटक

पावणे १९ लाखांचे कोकेनसह तस्करास अटक

मीरारोड - अमली पदार्थ विरोधी पथकाने मीरारोडच्या डेल्टा गार्डन येथे मध्यरात्री सापळा रचून १८ लाख ७५ हजार रुपयांच्या कोकेन ह्या अमली पदार्थासह तस्करास अटक केली आहे . 

वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक नगरकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी सह पवार , पाटील , शेख , खाजेकर , थोरात यांच्या पथकाने शुक्रवारच्या मध्यरात्री नंतर साडे बाराच्या सुमारास मीरारोडच्या डेल्टा गार्डन इमारत क्रमांक ३ च्या जवळ सापळा रचून तस्करास अटक केली . 

अनिल रामलिंग मेत्री ( ३०) रा . गणेश नगर , मंगतराम पेट्रोल पंपाचे मागे , भांडुप पश्चिम असे अटक आरोपीचे नाव आहे . त्याच्या कडे १२५ ग्रॅम वजनाचे १८ लाख ७५ हजार किमतीचे कोकेन आढळून आले . त्याचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आला असून काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Web Title: 19 lakh cocaine smuggler arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.