शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू मूसेवाला हत्याकांडात 1850 पानांचे आरोपपत्र; हत्येत 24 कुख्यात गुन्हेगारांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 20:00 IST

चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याचे म्हटले आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी मानसा पोलिसांनी 1850 पानांचे सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात एकूण 36 पैकी 24 आरोपींची नावे आहेत. या हत्येचा सूत्रधार गँगस्टर लॉरेन्सच्या नावाचाही आरोपपत्रात समावेश आहे. यासोबतच या प्रकरणात परदेशात बसलेल्या गोल्डी ब्रार, सचिन थापन, लिपिन नेहरा आणि अनमोल या चार गुंडांचीही नावे जोडली गेली आहेत.

पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या सविस्तर आरोपपत्रात 122 साक्षीदारांच्या जबाबांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हत्येवेळी तेथे उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी, हत्येवेळी तेथे उपस्थित असलेले मित्र, मुसेवालाचे पोस्टमार्टम करणारे डॉक्टर, ज्या हॉटेलमध्ये आरोपी थांबले, त्या हॉटेलचे कर्मचारी अशा अनेकांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 शूटर्सचे एन्काउंटर झाले आहे.

लॉरेन्स बिश्नोई पंजाब पोलिसांच्या ताब्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांची नावे समोर आली आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे तर गोल्डी ब्रार कॅनडात असल्याची माहिती आहे. इंटरपोलने गोल्डी ब्रारला रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तर, मूसवाला खून प्रकरणात नाव समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांचा तपास सुरुचएका मोठ्या कटाचा भाग म्हणून मुसेवाला यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मानसाचे एसएसपी गौरव तुरा म्हणाले, एसआयटी या संपूर्ण कटाचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मुसेवाला यांचे जुने वैमनस्य होते का, यातूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहत. विशेष म्हणजे, परदेशात असलेल्या आरोपींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस