शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आधी २६ वर्षीय शिक्षिकेची काढली छेड; तक्रार करताच विद्यार्थी पेट्रोल घेऊन घरात घुसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:51 IST

मध्य प्रदेशात एका विद्यार्थ्याने रागातून एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

MP Crime:मध्य प्रदेशातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात शाळेतील माजी विद्यार्थ्याने शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पूर्व वैमनस्यातून विद्यार्थ्याने हे धक्कादायक कृत्य केले. शिक्षिकेने आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार केली होती, ज्याचा बदला घेण्यासाठी शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.

सोमवारी घडलेल्या या घटनेत, २६ वर्षीय शिक्षिका २५ टक्के भाजली होता आणि तिला चांगल्या उपचारांसाठी जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी सूर्यांश कोचर, हा एक वर्षापूर्वीच दहावी उत्तीर्ण झाला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एकतर्फी प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे आणि त्या आधारावर तपास केला जात आहे. शिक्षिकेच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना दुपारी ३:३० च्या सुमारास घडली जेव्हा आरोपी पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन शिक्षिकेच्या घरी पोहोचला. त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला आग लावली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी शिक्षिकेचे शरीर २५ टक्के जळाल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेला  जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. आता शिक्षिका धोक्याबाहेर आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात शिक्षिकेने पारंपारिक साडी नेसली होती. आरोपी विद्यार्थ्याने यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार केली. याबद्दल तो संतप्त झाला. सोमवारी तो बाटलीत पेट्रोल घेऊन शिक्षिकेच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडताच त्याने तिच्यावर पेट्रोल शिंपडले आणि तिला आग लावली. आरोपी आणि शिक्षिका गेल्या २ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. आरोपी सूर्यांश कोचर याचे शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम होते. शाळेतून काढून टाकल्यानंतर तो दुसऱ्या शाळेत शिकत होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसfireआग