शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:25 IST

TikTok Star Sana Yousuf Death: पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. अवघ्या १७ वर्षांच्या सनावर गोळ्या झाडण्यात आल्या.

Sana Yousuf Shot Dead : पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षांची सोशल मीडिया स्टार आणि टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. २ जूनच्या रात्री तिच्या इस्लामाबादच्या सेक्टर जी-१३ मधील घरात तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने सनावर अतिशय जवळून गोळी चालवली. हा हल्लेखोर तिच्या घरात पाहुणा म्हणून आला होता. सनावर गोळी झाडून तो तिथून लगेच पसार झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेच्या काही वेळ आधीच सना घराबाहेर उभी राहून या हल्लेखोराशी बोलत होती. 

नेमकं काय झालं?

या हत्येचा घटनाक्रम सांगताना पोलीस म्हणाले की, एका अज्ञाताने घरात प्रवेश केला आणि अनेक गोळ्या झाडल्या. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. सनाला दोन गोळ्या लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाकिस्तान इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सनावर गोळ्या झाडणारा व्यक्ती तिच्या परिचयातील असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

का झाली सनाची हत्या? या हत्येमागचा उद्देश अजूनही समोर आलेला नाही. वैयक्तिक वाद, सामाजिक तणाव किंवा अशाच तत्सम कारणावरून सनाची हत्या झाली असावी का, याचा तपास पोलीस करत आहेट. मात्र, यावर अद्याप पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

कोण होती सना यूसुफ?

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील चित्राल भागात राहणारी सना यूसुफ टिकटॉकवर प्रसिद्ध होती. सोशल मीडियावर देखील तिची मोठी लोकप्रियता होती. तिला इन्स्टाग्रामवर तब्बल चार मिलियन लोक फॉलो करत होते. तिच्या मृत्यूने आता सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडियाTik Tok Appटिक-टॉकCrime Newsगुन्हेगारी