अमली पदार्थ विक्री प्रकरणात १७ जणांना लावला ‘माेक्का’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:49 IST2025-10-11T07:49:10+5:302025-10-11T07:49:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : अमलीपदार्थ विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. या ...

अमली पदार्थ विक्री प्रकरणात १७ जणांना लावला ‘माेक्का’
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : अमलीपदार्थ विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, या प्रकरणात सहभागी असलेल्या चौघांचा शोध सुरू आहे. टोळीचा म्होरक्या गुफरान हन्नान शेख हा आहे. त्याच्यासह १७ आरोपींवर मोक्का लावल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
या कारवाईत १५० किलो गांजा, कार, दुचाकी, रिक्षा, पिस्तूल, २ काडतुसे, २ वॉकीटॉकी, चार्जरसह ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. टोळीचा म्हाेरक्या गुफरान याच्यावर खडकपाडा, बाजारपेठ, भिवंडी, कल्याण ग्रामीण, मुंब्रा, डायघर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मुंबई, ठाणे, पुण्यासह तेलंगणात गुन्ह्यांची नोंद
गुफरानसह बाबर शेख,
सुनील राठोड, आझाद शेख,
रेश्मा अल्लाद्दीन शेख, शुभम उर्फ
सोन्या भंडारी, आसिफ शेख, सोनू
सय्यद, प्रथमेश नलावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे आणि योगेश जोध अशी आरोपींची नावे आहेत.
हे आरोपी बल्याणी, आंबिवली, बदलापूर, शिळफाटा, पुणे,
मुंबई, सोलापूर या भागातील राहणारे आहेत. यापैकी बाबर शेखविरोधात बदलापूर पोलिस ठाण्यात, सुनील राठोड याच्यावर बदलापूर, मुंबई, ठाण्यात, तर आझाद शेख याच्यावर कल्याणमध्ये दोन, शुभम भंडारी याच्या विरोधात
पुणे, तेलंगणा, खडकपाडा आणि योगेश जोध याच्या विरोधात पुणे, खडकपाडा पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.