शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इंदौर-उज्जैन हादरले! दोन आश्रमांत १७ चिमुरड्यांचा बळी; हायकोर्टाने प्रशासनाला धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:00 IST

मध्य प्रदेशातील दोन आश्रमांमध्ये दिव्यांग मुलांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

MP Ashram Deaths:मध्य प्रदेशातील इंदौर आणि उज्जैनमधील युग पुरुष आणि सेवाधाम आश्रमात मागील काही महिन्यांत तब्बल १७ दिव्यांग मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने स्वत:हून दखल घेतली असून, राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नेमके प्रकरण काय?

२०२४ च्या जून आणि जुलै महिन्यात इंदूरमधील युग पुरुष आश्रमात १० मुलांचा मृत्यू झाला होता, तर ६० हून अधिक मुले आजारी पडली होती. त्यावेळी प्रशासनाने श्वास घेण्यास त्रास हे मृत्यूचे कारण सांगितले होते. या घटनेनंतर इंदौरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी या आश्रमाची मान्यता रद्द केली आणि तेथील ८६ दिव्यांग मुलांना २५ डिसेंबर २०२४ रोजी उज्जैनच्या अंकित सेवाधाम आश्रमात हलवण्याचे आदेश दिले होते.

स्थलांतरानंतरही मृत्यूचे सत्र सुरूच

मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना उज्जैनला हलवण्यात आले खरे, पण तिथेही मृत्यूचे तांडव थांबले नाही. गेल्या १४ महिन्यांत उज्जैनच्या आश्रमात आणखी ७ मुलांचा मृत्यू झाला, ज्यामुळे एकूण मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. मृत मुलांचे वय १० ते १८ वर्षांच्या दरम्यान आहे.

वैद्यकीय अहवालातील धक्कादायक खुलासे

चरक भवन रुग्णालयाचे आरएमओ डॉ. चिन्मय चिंचोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातून आणलेली अनेक मुले आधीच मृत होती. उपचारादरम्यान दगावलेल्या मुलांमध्ये तीव्र ॲनिमिया आणि कुपोषणाची लक्षणे आढळली. ही मुले इतकी अशक्त होती की त्यांना साधे उभे राहणे किंवा चालणेही अशक्य होते.

आश्रम संचालकाचा दावा

सेवाधाम आश्रमाचे संचालक सुधीर भाई गोयल यांनी सांगितले की, इंदौरहून पाठवण्यात आलेली मुले आधीच अत्यंत गंभीर अवस्थेत होती. त्यांना श्वास घेण्याचे त्रास आणि फिट्स येण्याचे आजार होते. सध्या या आश्रमात २५० हून अधिक निराधार मुले असून, त्यातील ५० जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. दरम्यान, प्रशासनाने आता हा आश्रम बंद केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indore, Ujjain Shaken: 17 Children Die in Ashrams; Court Intervenes

Web Summary : Seventeen disabled children died in Indore and Ujjain ashrams, prompting court intervention. Anemia and malnutrition were factors. The High Court has demanded explanations from officials regarding the deaths. The ashram is now closed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCourtन्यायालय