१६ वर्षीय युवतीवर Instagram फ्रेंडचा बलात्कार; आईला पाठवले मुलीचे नग्न फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:55 IST2023-02-02T15:54:15+5:302023-02-02T15:55:05+5:30
या युवकाने मागील आठवड्यात दोनदा मुलीला हॉटेलला बोलावले. त्याठिकाणी तिचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो ऑनलाईन व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणला.

१६ वर्षीय युवतीवर Instagram फ्रेंडचा बलात्कार; आईला पाठवले मुलीचे नग्न फोटो
नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियात मैत्री सहजरित्या होऊन जाते. त्यातून अनेक जण प्रेमात पडतात काही लग्नही करतात. परंतु बऱ्याचदा ऑनलाईन मैत्री महागातही पडू शकते. या मैत्रीतून फसवणूक, बलात्कार आणि हत्येसारखा गुन्हाही घडतो. दिल्लीच्या गुरुग्राम इथं एका हॉटेलमध्ये ११ वीत शिकणाऱ्या १६ वर्षीय युवतीशी इन्स्टाग्राम फ्रेंडनं बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी बुधवारी या घटनेची माहिती दिली. जेव्हा आरोपीनं मुलीचे नग्न फोटो तिच्या आईला पाठवले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आईनं केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीची मागील वर्षी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली. या व्यक्तीने मुलीला न्यूड कॉलही केला होता. त्यानंतर आरोपीनं मुलीला गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला असं म्हटलं आहे.
या युवकाने मागील आठवड्यात दोनदा मुलीला हॉटेलला बोलावले. त्याठिकाणी तिचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो ऑनलाईन व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणला. मंगळवारी आरोपीने मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि मलाही पाठवले. जेव्हा मी माझ्या मुलीला याबाबत विचारले तेव्हा तिने हा प्रकार समोर आणला असं पीडितेच्या आईनं पोलिसांना सांगितले.
आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राज द्विवेदीविरोधात पॉक्सो अंतर्गत कलम ८, १२, आयपीसी ५०६ आणि अन्य कलमाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेवर प्राथमिक रिपोर्ट दाखल केला असून आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीही एक विद्यार्थी असल्याचं सांगण्यात आले आहे असं पोलीस अधिकारी पूनम सिंह यांनी म्हटलं.