शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मुंबई उपनगरातून १६ हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 15:42 IST

महिन्याभरात १४२ प्रकरणे, १२८ व्यक्तींना अटक, तर ५ वाहने जप्त; विना परवानगी मद्य साठ्यांवर मुंबई उपनगर जिल्ह्यात धडक कारवाई

ठळक मुद्देआचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व‍ नियमितपणे करण्यात येत आहे. १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे रुपये २ लाख ५५ हजार किमतीची ५ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

मुंबई - 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व‍ नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात ११ मार्च ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या विविध स्तरीय कार्यवाही दरम्यान १४२ प्रकरणी सुमारे १८ लाखांपेक्षा अधिक किंमतीचा अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. याच प्रकरणांमध्ये १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अवैध मद्यासाठी वाहतूक प्रकरणी सुमारे २ लाख ५५ हजार किमतीची पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे अनधिकृत वा अवैध मद्य साठ‌यावर कारवाई करण्यात येते. सार्वत्रिक निवडणूक विषयक आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच ११ मार्च २०१९ पासून मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीत देखील या खात्याद्वारे वेळोवेळी धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार ११ मार्च ते ३१ मार्च २०१९ या कालावधीदरम्यान विविध ९३ प्रकरणी सुमारे ९ लाख ४९ हजार ७७५ रुपये इतक्या किमतीचा ९ हजार ९२४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ८४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर रुपये १ लाख ९५ हजार एवढ्या अंदाजित किमतीची ३ वाहने देखील जप्त्‍ा करण्‍यात आली.१ एप्रिल २०१९ ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीदरम्यान विविध ४९ प्रकरणी सुमारे ८ लाख ५३ हजार ७६९ रुपये इतक्या किमतीचा ६ हजार १४० लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर अंदाजे रुपये ६० हजार किमतीची २ वाहने देखील जप्त करण्‍यात आली आहेत.

वरीलनुसार *११ मार्च २०१९ ते १५ एप्रिल २०१९* या कालावधीदरम्यान विविध १४२ प्रकरणी सुमारे १८ लाख ३ हजार ५४४ रुपये इतक्या किमतीचा सुमारे १६ हजार ६४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६१७ लीटर हातभट्टीची दारु, १३ हजार २०० लीटर इतक्या प्रमाणातील मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे 'वॉश' रसायन, ५२४.२८ लीटर देशी मद्य, २१८.६३ लीटर विदेशी मद्य, २५१.८७ लीटर बीअर, ताडी १,१९४ लीटर व इतर प्रकारचे ६०.२ लीटर मद्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच या अनुषंगाने १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे रुपये २ लाख ५५ हजार किमतीची ५ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकliquor banदारूबंदीArrestअटकPoliceपोलिस