शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 7:18 PM

Drugs Case : रामनगर पोलिसांची मोठी कारवाई 

ठळक मुद्देपूजा हरिश मोहीते रा. वरुड आणि ज्योती पद्माकर जायदे रा. शांतीनगर असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. 

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरु असताना वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा सुमारे दीडशे किलो गांजा रामनगर पोलिसांनी शांतीनगर परिसरातून जप्त केला. यावेळी दोन महिलांनाअटक करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांनी दिली. सलग दुसऱ्या दिवशी रामनगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

पूजा हरिश मोहीते रा. वरुड आणि ज्योती पद्माकर जायदे रा. शांतीनगर असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याचे पथक शांतीनगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावर असलेल्या सेवन टू सेवन या हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात दोन महिला संशयास्पदरित्या बसून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारला असता दोन्ही महिलांजवळ सात पोती दिसून आली. पोलिसांनी त्या सातही पोत्यांची तपासणी केली असता गांजा आढळून आला. दरम्यान पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींना अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक, पाेलीस उपनिरीक्षक पुंडलिक गाडवे, नीलेश घरडे, संदीप खरात, राजू अकाली, राहुल दुधकोहळे, पंकज भरणे, लोभेश गाडवे यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसWomenमहिलाDrugsअमली पदार्थ