शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१५ लग्न, ३ कोटींची फसवणूक..., फक्त ५ वी शिकलेला व्यक्ती निघाला 'लखोबा लोखंडे'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 09:35 IST

या व्यक्तीने अन्य ९ महिलांशी लग्न करण्यासाठी बोलणे सुरू असल्याची माहिती समजताच, या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

म्हैसूर :  बंगळुरुमधील एका व्यक्तीने जवळपास १५ महिलांची फसवणूक केली आहे. म्हैसूर पोलिसांना वैवाहिक वेबसाइट्सवर महिलांची फसवणूक करणार्‍या प्रकरणाचा तपास करताना हा 'लखोबा लोखंडे'चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीचे नाव महेश केबी नायक (३५ वर्षे) असून त्याने फक्त ५ वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच, या व्यक्तीने अन्य ९ महिलांशी लग्न करण्यासाठी बोलणे सुरू असल्याची माहिती समजताच, या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना धक्काच बसला. या महिला त्याच्याशी लग्न करण्याचे ठरवत असल्याचे स्पष्ट झाले. 

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, गेल्या १० वर्षांपासून महेश नायक वैवाहिक वेबसाइट्सवर महिलांना लग्नाचे आमिष दाखवण्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनियर असल्याचे सांगत होता. गेल्या आठवड्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. या आरोपीने या वर्षाच्या सुरुवातीला या महिलेशी लग्न केले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महेश नायक यांना तीन पत्नींपासून एकूण पाच मुले आहेत. तसेच, कथितरित्या त्याने किमान तीन महिलांची ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचेही म्हटले जाते.

महेश नायकविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने महेशविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, या दोघांची भेट २२ ऑगस्ट २०२२ रोजी एका वैवाहिक वेबसाइटद्वारे झाली होती. महेश नायकने स्वत:ला म्हैसूरमध्ये राहणारा ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचा दावा केला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर २२ डिसेंबर २०२२ रोजी महेश नायक या महिलेला म्हैसूरला घेऊन आला. याठिकाणी एका भाड्याने घेतलेल्या घरात ते दोघे गेले. पण महेश नायकने महिलेला सांगितले की, ते घर स्वत:चे आहे.

क्लिनिक सुरू करण्यासाठी मागितले ७० लाख रुपयेएफआयआरमध्ये म्हटले आहे की, महेश नायकने तिला शहरात नवीन क्लिनिक सुरू करत असल्याचेही सांगितले. यानंतर या वर्षी २८ जानेवारीला विशाखापट्टणममधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. ही महिला मूळची विशाखापट्टणममधील आहे. दुसऱ्या दिवशी तो म्हैसूरला परतला आणि ३० जानेवारीला महेश नायकने तिला तीन दिवस कामावर जावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला क्लिनिक सुरू करण्यासाठी ७० लाख रुपयांचे कर्ज मागितले आणि महिलेने नकार दिल्यावर त्याने तिला धमकावले.

१५ लाखांची रोकड आणि सोने घेऊन फरार झाला होतामहेश नायकने ५ फेब्रुवारीला महिलेची १५ लाखांची रोकड आणि सोने लुटल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. यानतंर महेश नायकशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही अपयश आले. पण तिला सर्वात मोठा धक्का बसला, जेव्हा दुसरी महिला महेश नायक आपला पती असल्याचा दावा करत घरात आली. त्यानंतर या महिलेने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करत अखेरीस महेश नायकला अटक केली. महेश नायकने दोन महिलांशी लग्न केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर ९ जुलैला  म्हैसूरच्या एका विशेष पथकाने महेश नायकला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न