Pune Vehicle Fire: शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:52 AM2022-01-13T09:52:20+5:302022-01-13T09:53:24+5:30

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली.

15 vehicles set fire in Shivne, Pune at night Shivkamal Prestige Society | Pune Vehicle Fire: शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

Pune Vehicle Fire: शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षा आगीत जळून खाक झाली. ही घटना बुधवारी पहाटे ५ वाजता घडली. कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावून वाहने जाळल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. 

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली. पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली.

अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, पार्किंगमध्ये अनेकदा शॉट सर्किट होऊन तेथील वाहनांना आग लागल्याचे दिसून येते. मात्र, या इमारतीतील विद्युत मीटरचे बॉक्सना आगीची झळ पोहचली नाही. त्यामुळे तेथून आग लागली नाही. ज्या वाहनाला पहिली आग लागली, त्याच्यावर पार्किंगमधील ट्युबलाईट जळाली आहे. या इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, आवाज आल्याने आम्ही खाली आलो, तेव्हा सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक झाल्या होत्या.

Web Title: 15 vehicles set fire in Shivne, Pune at night Shivkamal Prestige Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग