शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

15 लग्न, 4 मुलं; या ट्रिकनं महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा पाचवी पास तरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:06 IST

2014 पासून आतापर्यंत, त्याने जवळपास 15 महिलांसोबत लग्न केले असून, त्याला चार मुले असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एका तरुणाने ऑनलाईन पद्धतीने महिलांना आमिष दाखवून आणि खोटी आश्वासने देऊन त्यांच्याशी लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हैसूर शहर पोलिसांनी संबंधित तरुणांना रविवारी अटक केली. हा तरुण मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर स्वत:ला इंजिनिअर आणि डॉक्टर असल्याचे सांगत आणि खोटी आश्वासने देत तरुणींसोबत लग्न करायचा. 2014 पासून आतापर्यंत, त्याने जवळपास 15 महिलांसोबत लग्न केले असून, त्याला चार मुले असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महेश केबी नायक (३५) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. तो बनशंकरी, बेंगळुरू येथील रहिवासी आहे.

श्रीमंत तरुणींना अडकवायचा जाळ्यात - बंगळुरू येथील एका महिलेने संबंधित तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. महेशने या वर्षाच्या सुरुवातीलाच या महिलेसोबत लग्न केले होते. तक्रारीनंतर, पोलिसांनी एक टीम तयार करून महेशचा शोध सुरू केला आणि त्याला तुमकुरू येथे पकडण्यात आले. महत्वाचे म्हणजे, महेश केवळ पाचवीपर्यंतच शिकलेला आहे. ज्या महिलांनी त्याच्यासोबत ल्गण केले, त्या सर्व आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यावसायिक आहेत. लोक निंदेपोटी या महिला महेशविरुद्ध तक्रार दाखल करत नव्हत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मॅट्रिमोनिअल साइटवर स्वत:ला डॉक्टर, इंजिनिअर अथवा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून सांगायचा. त्याने लग्न केलेल्या महिलांपैकी चार जणींना मुले आहेत. यातच यांपैकी एका महिलेने आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.

तयार केला होता बनावट दवाखाना- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नायकने तुमकुरूमध्ये एक बनावट दवाखाना थाटला होता. त्याने येथे एक नर्सदेखील नियुक्त केली होती. याचा उद्देश आपण खरो खरचे डॉक्टर आहोत, हे दाखविणे होता. मात्र, इंग्रजी चांगले नसल्याने त्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला गेला नाही. एवढेच नाही, तर नायकने दवाखाना बांधण्यासाठी पैसे मागीतले होते आणि त्रासही देत होता, असेही संबंधित तक्रारीत म्हणण्यात आले आहे. तसेच, पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो पैसे आणि ज्वेलरी घेऊन फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसुसार, महेशच्या वडिलांनीही त्यच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, असा खुलासा झाल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीmarriageलग्नPoliceपोलिस