शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत विमा असल्याचे भासवून १५ लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 18:20 IST

फिर्यादी इंद्रजित भोसले यांची कुठलीही विमा पॉलिसी नाही, असे असतानाही काही मोबाईल फोनवरून त्यांच्याशी काही व्यक्तींनी संपर्क साधून त्यांची विमा पॉलिसी असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे पाठविली.

पिंपरी : विमा पॉलिसी नसतानाही विमा असल्याचे भासवून त्याचे पैसे मिळविण्यासाठी टॅक्स आणि प्रोसेसिंंग फी भरण्यास सांगत १५ लाख ७५ हजार ८१० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात  मंगळवारी (दि. २) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनधारकांवर गुन्हा दाखल आहे. इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ४४, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी इंद्रजित भोसले यांची कुठलीही विमा पॉलिसी नाही. असे असतानाही काही मोबाईल फोनवरून त्यांच्याशी काही व्यक्तींनी संपर्क साधून त्यांची विमा पॉलिसी असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे पाठविली. वेळोवेळी फोन करून विम्याची रक्कम वाढत असल्याचे सांगितले. विम्याचा कालावधी संपल्याने त्या पैशांसदर्भात आरोपी मोबाईलधारकांनी पैसे काढण्याचे भोसले यांना सांगितले. मात्र विम्याच्या रकमेवरील टॅक्स आणि प्रोसेसिंंग फीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यात १५ लाख ७५ हजार ८१० रुपये भरण्यास भाग पाडले. २७ मार्च ते १० ऑक्टोबर २०१८ या कालावधीत त्यांनी ही रक्कम भरली. त्यानंतरही त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. कोणतीही विमा पॉलिसी नसल्याचे आणि अशा प्रकारचे विमा पॉलिसीचे कार्यालय कोठेही अस्तित्वात नसल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी भोसले यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChikhliचिखलीfraudधोकेबाजीPoliceपोलिस