शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख ६० हजारांची रोकड जप्त; तिघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:21 IST

उल्हासनगर -  निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये १५ लाख ६० हजार रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी तिघांना ...

ठळक मुद्देवेगवेगळ्या तीन घटनांमध्ये १५ लाख ६० हजार रुपयांची रोकड जप्त केली. या रोख रकमेबाबत राहुल आहुजा यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

उल्हासनगर - निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये १५ लाख ६० हजार रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.उल्हासनगरात निवडणूक अधिकारी जगजितसिंग गिरासे व नोडल अधिकारी युवराज भदाणे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता म्हारळगावनाका येथे एका कारमधून सहा लाख ५० हजारांची रोकड जप्त केली. यावेळी कारचालक अजबराट नाडर याला याबाबत विचारणा केली असता, त्याला रोख रकमेबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पथकप्रमुख संजय पवार यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून साडेसहा लाखांच्या रोकडसह नाडर यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी मध्यरात्री कॅम्प नं.-३, साईबाबा मंदिर चौकात भरारी पथकाच्या झडतीत एका कारमधून पाच लाखांची रोकड मिळाली. याप्रकरणी रविराज सिंघानी यांना ताब्यात घेऊन भरारी पथकप्रमुख विजय बहेनवाल यांनी सिंघानी यांना मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले.रविवारी सकाळी साडेअकरा वाजता पुन्हा म्हारळनाका येथे एका कारच्या झडतीत चार लाख १० हजारांची रोकड मिळाली. या रोख रकमेबाबत राहुल आहुजा यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliceपोलिसMONEYपैसा