शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रेल्वे पोलिसांकडून दीड कोटींचा मुद्देमाल हस्तगत; ४०२ गुन्ह्यांचा छडा

By नरेश डोंगरे | Updated: January 19, 2024 18:17 IST

१७ दिवसांत १७ मोबाईल जप्त

नागपूर : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) कार्यक्षेत्रात गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारचे ४०२ गुन्हे दाखल झाले. त्यात गुन्हेगारांनी लंपास केलेल्या मुद्देमालांपैकी ४०२ गुन्ह्यांची उकल करीत पोलिसांनी दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात नागपूर, गोंदिया, इतवारी, वर्धा, बडनेरा आणि अकोला असे सहा रेल्वे पोलिस स्टेशन तसेच भंडारा, नागभिड, अजनी, बल्लारशाह, अमरावती, वाशिम आणि मूर्तिजापूर या सात आउटपोस्टचा समावेश आहे. या एकूण १३ ठिकाणी वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली. रेल्वेचे पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे तसेच वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास केला.

महाराष्ट्रासह नक्षलग्रस्त छत्तीसगड व ईतर राज्यात जाऊन रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावला आणि त्यातील गुन्हेगारांकडून सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित तक्रारदारांकडून ओळख पटवून त्यांचा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला. जानेवारीच्या १७ दिवसांत चोरट्यांनी चोरलेल्या १७ मोबाईल चोरीचा पोलिसांनी छडा लावला. हे सर्व मोबाईल जप्त करण्यात आले. त्यात प्रमाणे गेल्या वर्षीच्या सात मोबाईल चोरीचाही छडा लावून एकूण २४ मोबाईल ज्यांचे त्यांना परत करण्यात आले.

१५० गुन्हेगार जेरबंदरेल्वेत गुन्हे करणाऱ्या १५० सराईत गुन्हेगारांना रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून १ कोटी, १५ लाख, ५२ हजार, ६३५ रुपयांच्या चिजवस्तू जप्त करण्यात आल्या. तर, गेल्या १७ दिवसांत (१ ते१७ जानेवारी २०२४) २४ गुन्हे उघडकीस आणत रेल्वे पोलिसांनी २ लाख, ५७ हजार, ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :RobberyचोरीnagpurनागपूरPoliceपोलिस