शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खेळातील भांडणातून १३ वर्षाच्या मुलाने केला मित्राचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 21:47 IST

अल्पवयीन मुलगा ताब्यात

पुणे : लहान मुलाच्या खेळाच्या भांडणातून १३ वर्षाचा मुलाने ११ वर्षाच्या मुलाला खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. केळेवाडीमध्ये ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी घडली होती. कोथरुड पोलिसांनी १३ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मैदानात खेळत असताना झालेल्या वादात ढकलून दिल्यानंतर डोक्यावर पडून मुलगा जखमी झाला. घरचे रागवतील म्हणून त्या मुलाच्य डोक्यात आणखी दगड घालून त्याला अर्धा गाढल्याचे समोर आले होते.

विश्वजित विनोद वंजारी (वय११, रा. केळेवाडी) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. वंजारी हा २९ जानेवारी सायंकाळी खेळायला जातो, असे सांगून बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत आला नव्हता. त्याच्या आईवडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. कोथरुड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. त्याच्या घरापासून सुमारे ५०० मीटरवर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये दगडाने त्याचा मृतदेह झाकून ठेवलेल्याचे ३१ जानेवारी रोजी पोलिसांना आढळून आले होते. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.

याबाबत कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यानी सांगितले, की मुलगा बेपत्ता झाल्यापासून त्याचा कसून शोध सुरू होता. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर डोक्याला मार लागल्यामुळे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू होता. मुलगा शेवटी कोणासोबत होता त्यावरून तपास करताना १३ वर्षाच्या मुलावर संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.

विश्वजीत व आरोपी अल्पवयीन मुलगा हा मित्र होते. ते दोघे एकत्र खेळायचे. त्यावेळी त्यांच्यात वादावादी होत होती. घटनेच्या दिवशी देखील दोघे खेळत होते. त्यावेळी विश्वजित याने त्याला चिडविले. खेळताना सतत मला एकटे पाडतात, असे म्हणून त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी पकडापकडीत आरोपीने विश्वजीत याचे नाक दाबले. त्यानंतर त्याला धक्का दिला. त्या ठिकाणी असलेल्या विटावर तो पडल्यामुळे डोक्याला गंभीर जखम झाली. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे आरोपी मुलगा घाबरला.

आता घरचे रागवतील म्हणून त्याने आणखी एक दगड त्याच्या डोक्यावर टाकला. तो दिसू नये म्हणून त्याच्या अंगावर बाजूने दगडे रचली. त्या ठिकाणी सिंमेटचा राडारोडा टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलास ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा विधी संघर्षित मुलगा शाळा शिकत होता. पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMurderखून