शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकद्वारे १३ महिलांना गंडा, भामट्यास अटक : १५ लाखांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:37 IST

फेसबुकवर आधी महिलांशी मैत्री करून स्वत:ची ओळख लपवून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सतीश मोरे उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील (३६, रा. घणसोली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली.

ठाणे : फेसबुकवर आधी महिलांशी मैत्री करून स्वत:ची ओळख लपवून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सतीश मोरे उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील (३६, रा. घणसोली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली. त्याला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राज्यभरातील १३ महिलांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. सतीशने फेसबुक अकाउंटवर आकर्षक दिसणाऱ्या तरुणाचे छायाचित्र लावून कल्याणमधील एका ३५ वर्षीय विवाहितेशी मैत्री केली. त्यासाठी त्याने फेसबुकवर शुभम पाटील या नावाचा वापर केला. तिच्याशी फेसबुकवर संवाद साधत तिच्याकडून त्याने तीन लाख १९ हजारांची रक्कम ऑनलाइनद्वारे घेऊन तिची फसवणूक केली. या प्रकरणी २९ डिसेंबर २०२० ला बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणूक व  माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तिने तक्रार केली. मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अंकुश शिंदे यांनी शुभम पाटील या नावाने फेसबुकवर खाते उघडणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची माहिती काढली. त्या वेळी हा मोबाइल घणसोली रेल्वे स्थानक परिसरातील असल्याचे समजले; परंतु हा मोबाइल सतीश मोरे याचा असून, तो घणसोली स्थानक परिसरात फिरत असल्याचेही उघड झाले. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, प्रदीप भोईर आणि जमादार श्यामराव कदम आदींच्या पथकाने २ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घणसोली स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत सतीशने आपण फेसबुकवर शुभम पाटील आणि सोनू पाटील या नावाने अकाउंट सुरू केल्याचे सांगितले. त्याने अशाच प्रकारे १३ महिलांची १५ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याची कबुली दिली. स्वत:ची ओळख लपवून तो फेसबुकवर मैत्री केलेल्या महिलांशी संवाद साधत असल्याचे तपासातून समोर आले. पोलीस कोठडीत रवानगी n कल्याण, भिवंडी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, वसई, महाड, भायखळा, नेरूळ, पुणे, अमरावती, सातारा आणि रत्नागिरी आदी परिसरातील महिलांची त्याने अशाच प्रकारे गेल्या दोन वर्षांत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे. त्याला ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश ठाणे न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुक