शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

१३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल; छत्तीसगड पोलिसांकडून समानतेचं अभिनव पाऊल

By पूनम अपराज | Updated: March 2, 2021 21:19 IST

13 transgender hire as constables in Chhattisgarh : या १३ पैकी नऊजण रायपूर रेंजमधून भरती झाले होते आणि २० जण परीक्षेला बसले होते.

ठळक मुद्दे ट्रान्सजेंडर राईट्स एक्टिव्ह आणि मित वा समितीच्या अध्यक्षा विद्या राजपूत यांनी परीक्षेत निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.

छत्तीसगढ कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा निकाल सोमवारी लागल्यानंतर सोमवारी छत्तीसगडपोलिसांनी १३ ट्रान्सजेंडर व्यक्तींना राज्यातील चार जिल्ह्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.या १३ पैकी नऊजण रायपूर रेंजमधून भरती झाले होते आणि २० जण परीक्षेला बसले होते. “कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे निकाल लागले आहेत आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. आम्ही प्रथमच ट्रान्सजेंडर लोकांना कॉन्स्टेबल म्हणून भरती केले आहे आणि मी त्यांचे वैयक्तिक अभिनंदन करतो, ”असे छत्तीसगडचेपोलिस महासंचालक डीएम अवस्थी यांनी सांगितले.आतापर्यंत भारतात फक्त दोन ट्रान्सजेंडर पोलीस  भरती करण्यात आले होते. एक तामिळनाडूमध्ये, दुसरा राजस्थानमध्ये. आता बिहार सरकारने अलीकडेच पोलीस दलात ट्रान्सजेंडर्स भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.निवडलेल्या उमेदवारांना संधीबद्दल अभिमान वाटला."मी आज खूप आनंदी आहे ... मला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. मी आणि माझे सर्व सहकारी यांनी या परीक्षेसाठी खूप परिश्रम घेतले. आमच्यासाठी ही एक दुर्मीळ संधी होती. ज्यामुळे आपले जीवन बदलू शकले, म्हणून प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम घेतले. -  कृष्णा. तांडी, एक ट्रान्सजेंडर (ज्याची कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली)आणखी एक यशस्वी उमेदवार कोमल साहूने तिला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस म्हणून संबोधले. ती म्हणाली, “मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते. पण तसे झाले,” ती पुढे म्हणाली.२०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने पुरुष आणि महिलासमवेत ट्रान्सजेंडर समुदायाला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांवर त्यांना समान विशेषाधिकार असल्याचा निर्णय दिला. २०१७ मध्ये छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्या भरती परीक्षेत तृतीय लिंग समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.अखेर २०१९ -२०  मध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. रायपूर पोलिस मुख्यालय अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात एकूण २०३८ कॉन्स्टेबल भरती करण्यात आल्या असून त्यात १७३६ पुरुष, २८९  महिला आणि एकूण १३ ट्रान्सजेंडर लोकांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या किन्नर समाज आणि मितवा समितीने संधी दिल्याबद्दल छत्तीसगड सरकारचे आभार मानले आहेत. ट्रान्सजेंडर राईट्स एक्टिव्ह आणि मित वा समितीच्या अध्यक्षा विद्या राजपूत यांनी परीक्षेत निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :PoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगडGovernmentसरकारTransgenderट्रान्सजेंडर