नागपुरात बनावट बील देऊन १३ लाखाने फसवणूक : आरोपीला पुण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:49 IST2020-02-22T00:48:47+5:302020-02-22T00:49:34+5:30
बनावट बिल सादर करून १३ लाखाने फसवणूक करणाऱ्या पी. पी. बाफना लॉजिस्टीक कंपनीच्या अधिकाऱ्याला आर्थिक शाखा पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे.

नागपुरात बनावट बील देऊन १३ लाखाने फसवणूक : आरोपीला पुण्यात अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट बिल सादर करून १३ लाखाने फसवणूक करणाऱ्या पी. पी. बाफना लॉजिस्टीक कंपनीच्या अधिकाऱ्याला आर्थिक शाखा पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. आशिष राजपूत असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील रहिवासी राजपूतने आपल्या साथीदाराच्या मदतीने शिवाश्री ट्रान्सपोर्ट कंपनीचे बनावट बिल तयार केले. हे बिल करुणा रेड्डी (३८) रा. हजारी पहाड यांच्याकडे सादर करून १३ लाख २३ हजार रुपये घेतले. आरोपीने बनावट बिल सादर केल्याची माहिती कळताच रेड्डी यांनी तक्रार दाखल केली. अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आर्थिक शाखा पोलिसांच्या पथकाला राजपूतला अटक करण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याला अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्याला २६ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.